कैलास पुरी, झी मीडिया, पुणे:   गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयुक्तालयाला मान्यता मिळाली. आता शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा हीच काय ती अपेक्षा. दरम्यान, सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केलंय....! पण त्याच वेळी पोलिसांनी त्यांची कार्यशैली बदलावी आणि गुंडांवर वचक बसवावा अशी अपेक्षाही व्यक्त केलीय. तर, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी तर पिंपरीचे पोलिसच गुंडाना अभय देत असल्याचा आरोप केलाय.


निर्णयाचे जोरदार स्वागत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्यांचा वावर, गोळीबार आणि हत्या, गाव गुंडांच्या टोळ्यांचा हैदोस, वाहन तोडफोड - चोऱ्या अशा अनेक घटनांनी सातत्याने चर्चेत असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची ओळख गेल्या काही वर्षात बेस्ट सिटी कडून क्राईम सिटी कडे होत चालली होती. गोल्ड मॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणानं तर शहराची प्रतिमा डागाळली. त्याचमुळे शहरात स्वतंत्र आयुक्तालय असावं ही मागणी जोर धरत होती. अखेर या मागणीला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आणि आयुक्तालयाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केलंय....! पण त्याच वेळी पोलिसांनी त्यांची कार्यशैली बदलावी आणि गुंडांवर वचक बसवावा अशी अपेक्षाही व्यक्त केलीय. तर, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी तर पिंपरीचे पोलिसच गुंडाना अभय देत असल्याचा आरोप केलाय.


शहरातील गुन्हेगारीला चाप बसण्याची आशा


शहरात महिन्यात दहावीतला विद्यार्थी वेदांत भोसलेसह एकूण सात हत्या झाल्या. गोळीबार, घरफोड्या या घटना तर वेगळ्याच. एप्रिल महिन्याची तर सुरुवातच देहू रोड पोलिसांनी पुणे बंगळुरू हायवे वर केलेल्या ओल्या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ ने झाली.  म्हणूनच आयुक्तालय गरजेचे असले तरी पोलिसांची कार्यशैली बदलण्याची नितांत गरज आहे हे ही तितकेच खरे.