Aurangabad News :  विवाहाच्या जेवणातून तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये (Aurangabad) समोर आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याच्या (NCP leader abdul qadeer moula) मुलाच्या लग्नात हा सर्व प्रकार घडला आहे. जेवणानंतर विवाहाला आलेल्या 700 पाहुण्यांना विषबाधा (poisoning) झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. विवाहाला आलेल्या पाहुण्यांसाठी हे जेवण जीवघेणे ठरले असते. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदीर मौलाना (Abdul Qadeer Moulana) यांच्या मुलाचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्यात  मोठ्या प्रमाणात पाहुणे उपस्थित होते. यावेळी लग्नानंतर 700 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. विवाहसोहळ्यात जेवणानंतर अनेकांना उलट्या, जुलाब, मळमळ असा त्रास सुरु झाला. तब्बल विवाह सोहळ्यात जेवणाचा आस्वाद घेतलेल्या 700 जणांना असाच त्रास सुरु झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



औरंगाबाद शहरात हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. आलेल्या पाहुण्यांसाठी खास मेजवाणीची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हीच मेजवाणी अनेकांसाठी भारी पडली असती. एकाच वेळी अनेकांना त्रास सुरु झाल्याने मोठी खळबळ उडाली. विवाहासाठी आलेल्या पाहुण्यांना रुग्णालय पाहायला लागलं. दुसरीकडे अनेकांना उपचारानंतर मध्यरात्रीच डिस्चार्ज देण्यात आला.


सर्वांची प्रकृती स्थिर


या घटनेनंतर कदीर मौलाना यांच्या जवळच्या व्यक्तीने माहिती दिली. काही लोकांना त्रास झाला असून कोणीही गंभीर नाही अशी माहिती मौलाना यांच्या जवळच्या व्यक्तीन दिली आहे. तसेच हा कार्यक्रम कदीर मौलाना यांच्या घरी नव्हता तर तो मुलीच्या घरी होता. मौलाना यांच्या घरी आज कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, असेही कदीर मौलाना यांच्या जवळच्या व्यक्तीने म्हटले आहे.