बालगृहातल्या कर्मचाऱ्याकडून मुलींचं लैंगिक शोषण, आरोपीला अटक

Wed, 12 Sep 2018-3:39 pm,

बंडू कुत्तरमारे या कर्मचाऱ्याला अटक

चंद्रपूर : चंद्रपुरात बालगृहात अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा प्रकार उघड झालाय. स्नेहदीप बालगृहातल्या बंडू कुत्तरमारे या कर्मचाऱ्यानेच हे लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय. बालविकास संरक्षण समितीच्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघड झालाय.


या प्रकारामुळे बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आलीय. इथल्या मुलींना अन्यत्र हलवण्यात येणार आहे. देशभर बालगृहांची तपासणी करण्यासाठी समित्यांचे गठन झाले. चंद्रपूरातही एड. वर्षा जामदार यांच्या अध्यक्षतेत एका उच्चस्तरीय समितीने शहर-जिल्ह्यातील बालगृहांची तपासणी केली. 


प्रथमदर्शनी सर्व आलबेल वाटत असतानाच दबावात असलेल्या नऊ अल्पवयीन मुली आणि एका मुलांनी हळूहळू आपबिती सांगण्यास सुरुवात केली. यात स्नेहदीप बालगृहातील एका कर्मचाऱ्याने एका बालिकेवर अत्याचार तर एका मुलीचा विनयभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. 


आरोपीनं या सर्व मुलींना घडलेली घटना कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. बंडू कुत्तरमारे या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link