Maharashtra Politics: राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. मुंबईच्या वाय.बी.सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेत त्यांनी राष्ट्रवादी एकसंध राहण्यासाठी एकत्रित काम करण्याची विनंती पवारांना केली. पवारांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं कुठलीही वेळ न मागता अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? अशी चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या मेळाव्यातून शरद पवारांच्या कार्यप्रणालीवर उघड टीका अजित पवारांनी केली होती. कालपर्यंत पवारांवर तुटून पडणारा अजित पवार गट अचानक कोणतीही वेळ न मागता.. शरद पवारांच्या भेटीला गेला. त्यामुळे चर्चा सुरु झाल्या. राजकारणात दिसतं तसं नसतं. पडद्यामागून नेमकं काय घडतंय याचा अंदाज बांधता येत नाही. जे घडतंय ते कशाचीतरी पायाभरणी असू शकते किंवा पडद्यामागे शिजत असणा-या राजकीय नाट्याचा एखादा प्लॉट असू शकतो..याचंच एक बोलकं उदाहरण काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांनीही दिलं होतं. 


2019 मध्ये पहाटेचा शपथविधी झाला. अनपेक्षितपणे सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं मविआ सरकार आलं. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड महाराष्ट्रानं पाहिलं. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवारांचं बंड झालं. बंडांनंतर महिन्याभराच्या अजित पवारांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. अनपेक्षित वाटतील अशा अनेक घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसल्यात. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो हेही राज्यानं पाहिलंय. त्यामुळे राजकारणात जसं दिसतं तसं नसतं हेच खरं.
अजित पवार यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
आपल्याला पुरोगामी विचार पुढे न्यायाचाय, भाजपसोबत जायचं नाही असं मत अजित पवार गटाच्या भेटीनंतर शरद पवारांनी मांडल्याची  माहिती रआहे. पुरोगामी विचार असणा-यां सोबत राहण्याची आपली भूमिका असल्याचं पवार म्हणाल्याचं सूत्रांकडून समजतंय. युवक  राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत पवार यांनी हे मत मांडलं. ही बैठक मुंबईत NCP प्रदेश कार्यालयात झाली.