शिर्डी : शिर्डी साई मॅरेथॉनला सकाळी साडेसहा वाजता फ्लॅग ऑफ करुन सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय पोलीस दलातील अधिकारी कृष्ण प्रकाश आणि अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेचे उदघाटन केलं.


अशी असणार स्पर्धेची रूपरेषा 


पाच, दहा, एकवीस आणि एकेचाळीस किलोमीटर अशा विविध गटात ही स्पर्धा पार पडते. दहा किमीच्या मॅरेथॉनमध्ये सातशे धावपटू, 21 किमीमध्ये 600 आणि 41 किमीमध्ये दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला.


महिलांची मोठा सहभाग 


यांत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. भारतीय धावपटूंसह परदेशातील खेळाडूंचाही यांत मोठा सहभाग आहे. यामध्ये इथिओपियन खेळाडूंचाही सहभाग आहे. 41 किलोमिटर मध्ये 150 स्पर्धकांनी तर 21 किमी मध्ये 600 आणि 10 किमी मध्ये 7़़00 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.