मुंबई : Shiv Sena Crisis : बंडानंतर शिवसेनेने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे. आमदारांपासून उपशाखाप्रमुखांपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 39 आमदार गेलेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर महाविकास आघडी सकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेनेने मोठ्या बंडाळीनंतर सावधगिरीचे पाऊल उचलेले आहे. शिवसेना आता सावध झालीय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडून लिहून घेतलं जात आहे. त्यासाठी मोहीम सुरु केली आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे, असा मजकूर प्रतिज्ञापत्रात आहे. आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेत आहेत.


प्रतिज्ञापत्रात काय म्हटलेय?


माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च पुष्टी करीत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टये पूर्ण करण्यासाठी मी सदैव कायर्रत राहीन अशी ग्वाही देतो, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.