रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचं ३२ मण सोन्याचं सिंहासन पुनरस्थापित करण्याचा संकल्प किल्ले रायगडावर करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील जवळपास २० हजार  शिवभक्त धारकरी किल्ले रायगडावर जमले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळीच्या माळावरील शिवपुतळयासमोर जमलेल्या शिवभक्तांनी रायगडावर ३२ मण सोन्याचं सिंहासन पुन्हा उभे करण्याची शपथ घेतली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, संभाजी भिडे गुरूजी, प्रवचनकार सु. ग. शेवडे, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केलं. दरम्यान, या सिंहासनासाठी कोणतीही शासकीय मदत घेतली जाणार नाही.