धक्कादायक! 2 रूग्णालयात पायपीट, तरीही उपचार नाहीच; रुग्णवाहिकेतील प्रसूतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोड तालुक्यातील आमठाणा या भागात ही घटना घडली आहे. यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सरकारी रूग्णालयावर आरोप केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उपचारांअभावी रूग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने मातेसह बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचं वय 27 वर्ष होतं. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा या भागात ही घटना घडली आहे. यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सरकारी रूग्णालयावर आरोप केला आहे.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील मदिनाबी जमील शाह या गरोदर होत्या. प्रसूतिवेदना सुरू झाल्याने त्यांना पतीसह एका नातेवाईक महिलेने तिला आमठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी तिच्यावर प्रसूतीसाठी प्रयत्न करताच तिथल्या डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांनी रात्री ९ वाजता सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं. या ठिकाणीही या गरोदर महिलेवर उपचार झाले नाही.
घाटी रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय
सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसुतीसाठी प्रयत्न न करता तिला रात्री 12 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या धाटी रूग्णालयात पाठवलं. मात्र ज्या 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत तिला पाठवण्यात आलं होतं त्यामध्ये एकाही डॉक्टरचा समावेश नव्हता. यावेळी परिणामी रस्त्यातच महिलेची प्रसूती होऊन मुलगा झाला. मात्र घाटी रुग्णालयात पोहचल्यावर बाळ मृत्यू पावल्याच डॉक्टरांनी सांगितलं. शिवाय यानंतर महिलेवर उपचार सुरू असताना तिचा देखील मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे.