Pune Crime News : दिवाळीमध्ये पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  धनत्रयोदशीदिवशी बँकेतील सर्व दागिने पूजेसाठी घरी आणले मात्र त्यानंतर संबंधित कुंटूबाने एक चूक केली आणि त्यांना मोठा फटका बसला आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरातील ही घटना असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (shocking incident of theft in Karvenagar area of Pune latest marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
धनत्रयोदशीसाठी पुण्यातील गौरंग होनराव यांनी आपलं बँकेमधील लॉकमध्ये ठेवलेलं सोनं पूजेसाठी घरी आणलं. विधिवत पूजा केली आणि सर्व सोनं तिथेच ठेवत त्यांनी मोठी चूक केली ती म्हणजे घराचं दार लावलं नाही. घराचं दार न लावणं त्यांना महागात पडलं. दार बंद न करता सर्व कुटुंब झोपी गेलं रात्री मोठा गेम झाला. 


होनराव यांचं सर्व कुटुंब गाढ झोपी गेलं होतं अन् याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. पहाटे पाच वाजेपर्यंत हात मारत घरातील सर्व दागिने लंपास केले. चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत ही जवळपास 8 लाख इतकी होती. होनराव यांनी वारजे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


दिवाळीमध्ये झालेल्या या चोरीमुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. पोलीस या चोरीचा तपास करण्यात यशस्वी होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.