कोल्हापूर : पंचगंगेच्या पुलावर अपघाताच्या दिवशी स्ट्रीट लाईट होते बंद
कोल्हापुरात पंचगंगेच्या पुलावर झालेल्या बस अपघाताच्या दिवशी आणि त्यापूर्वी तब्बल १० वर्षे शिवाजी पुलावर आसणारे स्ट्रीट लाइट सुरु नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात पंचगंगेच्या पुलावर झालेल्या बस अपघाताच्या दिवशी आणि त्यापूर्वी तब्बल १० वर्षे शिवाजी पुलावर आसणारे स्ट्रीट लाइट सुरु नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्ट्रीट लाईट बंद होते
पुलावर स्ट्रीट लाइट सुरु करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. पण लालफितीचा पारदर्शक कारभार करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला याचं काही सोयर सुतक नव्हत हे दिसून आलंय. अपघातानंतर आत्ता कोल्हापूर महानगरपालिकेनं स्वता या पुलावरील स्ट्रीट लाइट सुरु करुन घेतलेत.
पुलाचं काम कधी होणार पूर्ण?
कोल्हापुरातील शिवाजी पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देऊन टेम्पो ट्रॅव्हलर गाडी पंचगंगा नदीत कोसळुन २६ जानेवारीला मोठा अपघात झाला होता. या अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. हा अपघात गाडीच्या ड्राव्हरच्या चुकीमुळं घडला असला तरी, या घटनेमुळं अर्थवट राहिलेल्या नव्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. इतकच नव्हे तर जुन्या शिवाजी पुलाचं आयुष्यमान संपल असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं ६ जुन २०१५ रोजी कळवलं आहे. तरी देखील या पुलावरुन आजही वाहतुक सुरु आहे.
अर्धवट पूल
दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ६ वर्षापुर्वी पर्यायी पूल केंद्राकडून मंजूर करून आणला, मात्र गेली 3 वर्षे हा पूल अर्धवट स्थितीत पडला आहे. पुरातत्व विभागानं परवाणगी न दिल्यानंच या पुलाचं काम अर्धवट असल्याचं सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सांगत आहेत. जर पुरातत्व विभागानं या पुलाच्या बांधकामाला मंजुरीच दिली नव्हती तर या पुलाचं ८० टक्के काम कसं पुर्ण करण्यात आलं हा देखील मोठा सवाल आहे.