धक्कादायक ! डेक्कन क्वीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अळ्या
कर्मचाऱ्यांकडून असमाधानकारक उत्तर
पुणे : धक्कादायक बातमी डेक्कन क्वीनमधून आली आहे. डेक्कन क्वीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये चक्क अळ्या सापडल्या आहेत. पुण्यातले सागर काळे १९ जुलैला मुंबईहून पुण्याला येत होते. त्यांनी डेक्कन क्वीनमध्ये ऑमलेट मागवलं. त्याबरोबर आलेल्या मीरपूडच्या पाकिटात अळ्या होत्या. याविषयी तक्रार करुनही तिथल्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
रेल्वे प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता याबाबत काय कारवाई केली जाते हे पाहवं लागणार आहे.
डेक्कन क्वीन ही एक्सप्रेस पुणे-मुंबई दरम्यान धावते. डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये अनेक जण पुणे ते मुंबई रोज प्रवास करतात.