विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : खरंच माणुसकी शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न पुन्हा एका उपस्थित झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी बातमी संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) घडली आहे. रस्ता ओलांडताता एका तरुणाला अज्ञात वाहनानं धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक फरार झाला. पण वाहनाच्या या धडकेत तो तरुण रस्तावरच कोसळला. अपघातात तो तरुण गंभीर जखमी झाला. पण याहून दुर्देव म्हणजे रस्त्यावर पडलेल्या या तरुणाच्या मदतीला एकही हात पुढे आला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 मिनिटं तो तरुण तडफडत होता
अपघातग्रस्त तरुण तब्बल 20 मिनिटं रस्त्यावर तडफडत होता. यादरम्यान अनेक वाहनं त्याच्या आजूबाजूने केली. पण त्या तरुणाला एकानेही मदत केली नाही. बऱ्याच वेळानंतर जखमी तरुणाला रुग्णालायत नेलं, पण तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. वेळीच त्या तरुणाला मदत मिळाली असती तर कदाचित त्या तरुणाचा जीव वाचला असता.


काय आहे नेमकी घटना
रविवारी सकाळी 9 वाजून 54 मिनीटांनी चहाच्या दुकानात काम करणारा सुनिल काळे हा तरुण आकाशवाणी चौका जवळ रस्ता ओलांडत होता त्याचवेळी रस्त्यावरील भरधाव वाहनानं सुनिलला जबर धडक दिली. सुनिल रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला, त्याच्या आजूबाजुने शेकडो वाहनं गेली मात्र कुणीही थांबले नाही, सुनिल तसाच तब्बल 20 मिनिटे पडून होता. रस्त्यावरच्या सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य कैद झाली आहेत.  काही वेळानं सुनिल जिथं काम करत होता तो चहा दुकानाचा मालक आला आणि त्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र ते पर्यंत सुनिलचा जीव गेला होता. माझ्या भावाला कुणी उचललं असतं आणि दवाखाण्यात नेलं असतं तर त्याचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया सुनिलच्या बहिणीने दिली आहे. 


घरात एकुलता एक कमवणारा
सुनील घरी एकटाच कामावणारा, त्याचा लहान भाऊ बाहेरगावी छोटी मोठी नोकरी करतो. घरी आई आणि आंधळी बहिण त्यांचा कमावणारा हात आता संपलाय. किमान कुणी माणूसकी दाखवली असती तर सुनिलचा जीव वाचला असता, मात्र लोकांच्या उदासिनतेमुळे एका तरूणानं जीव गमावला.


पोलिसांनी केलं आवाहन
अपघाताची ही दुर्देवी घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उजेडात आली. कुणाचा अपघात झाला तर लोकांनी मदत करावी घाबरू नये किमान माणूसकी दाखवावी असे आवाहन आता पोलीसांनी केलं आहे.