गडचिरोली : गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. गुजरातमधली स्थिती ही काँग्रेससाठी अनुकुल असल्याचं शरद पवार म्हणालेत. तसंच गुजरातमध्ये जोरदार प्रचार करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचंही पवारांनी कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये काँग्रेससोबत विधानसभा निवडणूक लढेल, असं पवारांनी सांगितलं आहे. मोदी नागरिकांना फक्त मोठी स्वप्न दाखवत आहेत. बुलेट ट्रेन अस्तित्वात येणार नाही. नोटबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयांमुळे भाजपसोबत असलेला व्यापारी वर्ग नाराज आहे. ही नाराजी निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असं पवार म्हणाले आहेत.