पुणे : Pune College, University News: जिल्ह्यात महाविद्यालय सुरु करण्याबाबत अद्याप संभ्रम आहे. काही कॉलेजेस सुरु झाली आहेत. मात्र, विद्यापीठाला अजूनही सरकारी निर्देशांची प्रतीक्षा आहे. काही महाविद्यालयात लेक्चर्सही झाली, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. (Some colleges started in Pune, the university is still waiting for government instructions)  पिंपरी-चिचवडमध्ये मात्र महाविद्यालये सुरु आहेत. तर आज सुरु करण्यात आलेली महाविद्यालये बंद होणार, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'झी 24तास'ला दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  विद्यापीठ किंवा राज्य सरकार कडून आदेश आल्याशिवाय कॉलेजेस सुरू करता येणार नाहीत. पुण्यातल्या काही महाविद्यालयांनी अशी भूमिका घेतली आहे. तर येत्या दोन दिवसात राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. महाविद्यालय सुरू करण्याबाबत उद्या कुलगुरुंशी बैठक होणार आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करणार आहोत. दोन दिवसात तारीख आणि नियमावली दोन्ही गोष्टी जाहीर करणार असल्याची माहिती उद्य सामंत यांनी दिली.


आजपासून महाविद्यालय सुरु होण्याचा विद्यार्थ्यांना मेसेज, त्यानंतर संभ्रम



 दरम्यान, पुण्यातील महाविद्यालये सुरु की बंद याबाबत गोंधळ असताना पिंपरी चिचवडमध्ये मात्र महाविद्यालये सुरु झाली आहेत. विद्यार्थ्यांचं स्वागतही करण्यात आले आहे. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरु केल्याने समाधान व्यक्त केले. आम्ही मास्क घालून आणि कोविड नियमांचे पालक करुन वर्गात बसलो, असे स्पष्ट केले.


तर पुण्यातील कॉलेजेस सुरू करण्यावरून विद्यापीठ संभ्रमात असल्याचं दिसून येते आहे. शुक्रवारी आढावा बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आजपासून सीनियर महाविद्यालये सुरू होणार होती. मात्र विद्यापीठाला अजूनही सरकारी निर्देशांची प्रतीक्षा आहे. दरम्यान कोरोना आढावा बैठकीतल्या निर्णयानुसार पुण्यात अनेक कॉलेजेस सुरू झाली. विद्यार्थ्यांची लेक्चर्सही झाली आहेत.