पुणे जिल्ह्यात आजपासून महाविद्यालय सुरु होण्याचा विद्यार्थ्यांना मेसेज, त्यानंतर संभ्रम

Pune College, University News: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) धोका कमी होत असल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. राज्यात याआधी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर...

Updated: Oct 12, 2021, 09:27 AM IST
पुणे जिल्ह्यात आजपासून महाविद्यालय सुरु होण्याचा विद्यार्थ्यांना मेसेज, त्यानंतर संभ्रम title=

 पुणे : Pune College, University News: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) धोका कमी होत असल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. राज्यात याआधी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली. दिवाळीनंतर शाळा सुरु होतील, अशी अपेक्षा असताना त्याआधीच शाळा सुरु झाल्या आहेत. आता पुण्यात आजपासून महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरु होणार आहेत. तसा विद्यार्थ्यांना मेसेजही पाठविण्यात आला. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

महाविद्यालय सुरु होणार आहेत, असा विद्यार्थ्यांना मेसेज

महाविद्यालय सुरु होणार असल्याचे मुलांना कॉलेजच्या व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर असे मेसेज आले आहेत. आज मंगळवारपासून वर्ग सुरू होणार आहेत, असे या मेसेजमध्ये नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी असे काही ठरलेले नाही. विद्यापीठ याबाबत निर्णय घेईल. तसेच अधिकृत पत्र पाठविले, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसल्याचे दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

अजून शासनाचा निर्णय झालेला नाही - सामंत

दरम्यान, असा कोणताही निर्णय अजून शासनाचा झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील महाविद्यालय आजपासून सुरू होणार नाहीत. याबत पुणे विद्यापीठचे कुलगुरू यांच्याशी उदय सामंत यांनी चर्चा केली असून एक पत्र या संदर्भात पुणे विद्यपीठ काढणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोविड आढावा बैठकीत काय ठरले?

याआधी पुण्यातील शाळा सुरू झाल्या होत्या. आता महाविद्यालये आजपासून सुरू होणार होती. पुणे शहरातील शाळा सुरू झाल्या असताना मात्र महाविद्यालयाबाबत निर्णय झाला नव्हता. या पर्श्वभूमीवर शहरातील महाविदालये सोमवारपासून सुरू करण्यास शुक्रवारी झालेल्या कोविड आढावा बैठकीत परवानगी देण्यात आली होती. असं असताना शहरातील महाविद्यालय सोमवार ऐवजी मंगळवार म्हणजे आजपासून सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने काढले होते. त्यानुसार आजपासून महाविद्यालयाचे वर्ग भरणार आहेत आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये येण्यापूर्वी त्याचे लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे असल्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, मार्चनंतर पहिल्यांदाच दोन हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहे. 24तासात तीन हजार जण कोरोनामुक्त झाले, तर राज्यात सध्या 32 हजारहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कालची रुग्णवाढ बघितली तर दुसरी लाट ओसरली असं दिसतंय. राज्यात काल फक्त 1700नवे रुग्ण आढळले आहे.

तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात सलग 75 तास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी रात्री साडे बारा वाजता वाघोलीतल्या लसीकरण केंद्राला भेट दिली. पुणे जिल्ह्यामध्ये एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटले आहे.