मुंबई: समाजात असे काही लीडर्स असतात जे एक वेगळी दिशा देत असतात. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत एक नवा आदर्श तरुणांसमोर ठेवलेला असतो. शनिवारच्या मराठी लीडर्स कार्यक्रमात अशाच खास व्यक्तीची भेटणार आहोत. सोनाई मिल्क देशातील सर्वात मोठी डेअरी म्हणून ओळखली जाते. सोनाई केवळ दूधच नाही तर तूप आणि दुग्धजन्य पदार्थही तेवढेच प्रसिद्ध आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाई डेअरीमध्ये दिवसाला 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया होते. उद्योजक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या दशरथ माने यांचं हे यश आहे. आज सोनाईची उत्पादन अनेक घरांमध्ये वापरली जातात. पण त्यांच्या यशस्वी उद्योजकापर्यंतचा नेमका संघर्ष कसा होता. त्या संघर्षातून तरुणांनी काय प्रेरणा घ्यावी हे मराठी लीडर्सच्या माध्यमातून झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांचा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. 



एका शेतमजुराचा मुलगा ज्यानं उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. नुसतं स्वप्न पाहिलं नाही तर ते स्वप्न सत्यातही उतरवलं. केवळ 3 हजार रुपयांमधून सुरू केलेला किराणा मालाचा उद्योग ते उडिद व्यापारी आणि आता देशातील सर्वात मोठे डेअरी कुटुंबाचे मालक हा प्रवास थक्क करणारा आहे. 


देशातील सर्वात मोठ्या डेअरी उद्योगाचे मालक हा माने कुटुंबाचा प्रवास आहे. 3000 रुपयांपासून सुरू केलेला उद्योग आजच्या घडीला वर्षाकाठी 2200 कोटी रुपयांची उलाढाल होते. माने कुटुंबाचा हाच प्रवास जाणून घेण्यासाठी विष्णुकुमार माने यांची मराठी लीडर्समध्ये विशेष मुलाखत आहे. ही मुलाखत झी 24 तासवर शनिवारी रात्री 9 वाजता पाहता येणार आहे.