विशाल करोळे, झी मीडिया, बीड : बाराही महिने दुष्काळानं ग्रासलेलं बीड जिल्ह्यातलं लहानसं कोळगाव (Beed Kolgaon). गाव लहान असलं तरी गावातल्या तरुणांना इंटरनेटचं (Internet) वरदान सापडलं आणि त्यांनी गावाची ओळखच बदलून टाकलीय. या गावातला प्रत्येक तरुण लखपती झालाय. दुष्काळाच्या (Drought) दुष्टचक्रात सापडलेल्या या गावानं इंटरनेटच्या सुपीक मातीत वेबसाइट्स (Website) आणि ब्लॉग्जची (Blogs) शेती केली आणि डॉलर्सचं (Dollers) पीक तरारून वर आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळी कोळगावात डॉलर्सचा पाऊस 
कोळगावातील अक्षय रासकर नावाच्या तरुणाच्या डोक्यात सर्वात आधी हे कमाईचं बीज रुजलं. शेतीतल्या जुगाड तंत्रज्ञानाचे व्हिडिओ (Agricultural Technology Videos) त्यानं यूट्युबवर (Youtube) टाकले. त्याला लाखो हिट्स मिळाले आणि त्याची 200 डॉलर्सची कमाई झाली. यातून प्रेरणा घेऊन त्याने शेतीविषयक वेबसाईट (Agricultural Website) बनवली आणि बघता बघता गुगल अॅडसच्या माध्यमातून उत्पन्न सुरू झालं. आजमितीला कोळगावातील तरुण 60 हून अधिक वेबसाइट्स चालवतात. यात शेती, व्यापार, फायनान्स, सरकारी योजना या सगळ्याशी संबंधित बातम्या आणि ब्लॉग्ज ते वेबसाईटवर अपलोड करतात



गावातील तरुण लखपती
अक्षय रासनेने गावात टोलेजंग बंगला बांधलाय. अक्षयसोबत गावातले जवळपास 40 हून अधिक तरुण लखपती बनलेत. त्यांची महिन्याची कमाई जवळपास 2 लाख रुपयांच्या आसपास आहे. अवघ्या २० वर्षांच्या सौरव लोंढेने ब्लॉगच्या कमाईतून दीड लाखांचा आयफोन, अडीच लाखांची स्पोर्ट बाईक घेतलीय. त्यावरून सौरव सुसाट फिरतो. गावातीलच आदित्य पाटीलनंही स्वतःचं घर बांधलं.. वडिलांचं स्वप्न पूर्ण साकारण्यासाठी बोलेरो गाडी घेतली. 



गावातील आणखी एक तरुण विनोद काशीदच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. मात्र ब्लॉगर झाल्यानंतर त्यानंही छान बंगला बांधला.. पाच-पाच मोबाईल घेऊन फिरतोय. मुलाच्या या कामावर त्याची आई बेहद्द खुश आहे.



हेही वाचा : ...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण


 


तीतूनच, पण इंटरनेटच्या माध्यमातून डॉलर्सचं पीक काढणारे हे अवलिये. यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजुबाजूच्या पंचक्रोशीतले 200 हून अधिक तरुणही आता ब्लॉगर्स बनलेत.  कोळगावातील तरुणांना पाहून आता गावातील 200 हून अधिक तरुण तर आजूबाजूच्या गावातीलही अनेक तरुण ब्लॉगर्स बनलेत. यातून चांगलं उत्पन्न मिळवत आहे. त्यामुळे मागासलेला भाग अशी ओळख असलेलं हे गाव आता लखपती तरुणांचं गाव,  ब्लॉगर्सचं गाव अशी वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे