...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण

एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने नाशिक हादरलं होतं. या हत्याप्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.

Updated: Mar 22, 2023, 03:27 PM IST
...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण

सागर गायकवाड झी मीडिया, नाशिक : शहरातील ध्रुव नगर (Nashik Dhruv Nagar) इथं एका 3 महिन्याच्या चिमुरडीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची माहिती मुलीच्या आईने दिली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Nashik Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या हत्याप्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. पोलीस तपासात हत्येचं खरं कारण समोर आलं असून या घटनेने खळबळ उडाली आहे. (Mother Killed Three Month Baby Girl)

काय होती नेमकी घटना?
नाशिक शहरातील ध्रुव नगर इथं भूषण रोकडे हे आई, पत्नी आणि तीन महिन्यांच्या धृवांशीबरोबर राहातात. सोमवारी भूषण नेहमीप्रमाणे कामाला गेले. संध्याकाळ त्यांची आई दुध आणायला बाहेर गेल्या. यावेळी घरात भूषण यांची पत्नी युक्ती आणि मुलगी धृवांशी या दोघीच होत्या. काही वेळाने भूषण यांच्या आई घरी परतल्या, पण समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. सून युक्ता जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तर चिमुकल्या धृवांशीची रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. भूषण यांच्या आईने आरडाओरडा करुन शेजारच्यांना बोलवून घेतलं. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. युक्ताने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक अज्ञात महिला घरी आली आणि तीने आपल्याला बेशुद्ध करुन धृवांशीची हत्या केली. 

ध्रुवांशीच्या आईची 10 तास कसून चौकशी
युक्ता रोकडे यांनी दिलेलं कारण पोलिसांना सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटत होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपाणी केली. शेजारच्यांचे जबाब नोंदवले. पण युक्ती रोकडे यांनी वर्णन केलेली बाई कुणीच पाहिली नव्हती किंवा सीसीटीव्हीतही त्या वेळेत अशी बाई इमारतीत दिसली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी युक्ता रोकडे हिच्याकडे कसून चौकशी सुरु केली. पण युक्ताने दिलेल्या जबाबात तफावत आढळत असल्याने पोलिसांना काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला. त्यांनी युक्ताकडे कसून चौकशी सुरु केली. सलग 10 तासांच्या चौकशीनंतर अखेर युक्तानेच आपल्या मुलीची हत्या केल्याची कबूली दिली. हत्येचं कारण ऐकूण पोलिसांनाही धक्का बसला. 

हत्येमागचं कारण मन सून्न करणारं?
भूषण आणि युक्ता यांना कन्यारत्न झालं. मोठ्या हौशेने तिचं नाव ध्रृवांशी ठेवण्यात आलं. गोड ध्रुवांशीने सर्वांनाच लळा लावला. पण हेच तिच्या हत्येचं कारण ठरलं. पती आणि सासू ध्रृवांशीला जीव लावत असल्याने तिची आई वैफल्यग्रस्त झाली होती. यातूनच तीने पोटच्या मुलीची गळा चिरून अतिशय निर्दयपणे हत्या केली. पोलिसांनी मारेकली आईला ताब्यात घेतलं आहे. 

मुलगी झाल्यानंतर पती आणि सासु मुलीलाच जीव लावत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मातेने पोटच्या गोळ्याचा गळा चिरुन खुन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी मारेकरी आई ला ताब्यात घेतले आहे .