दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात विविध पक्षांच्या यात्रेचे पीक पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा,राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू असताना आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे संवाद दौरा काढणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 ऑगस्टपासून सुळे यांच्या संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा सुरू होणार असून सहा जिल्ह्यात हा दौरा असणार आहे. 



राज्यातील पूर परिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ कारभार  या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यांतील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. संवाद दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात दिनांक २३ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद दौरा करणार आहेत. 


विशेष म्हणजे राष्ट्रवादीने याआधी शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे, या यात्रेत अजित पवार, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे फिरत असताना सुप्रिया यांचा वेगळा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. यासाठी शिवस्वराज्य यात्रेनंतर सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू होणार आहे.