Sushma Andhare Challenge MNS: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ठाण्यामधील कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. गडकरी रंगायतन येथील उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी केवळ गोंधळच घातला नाही तर उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ आणि शेणही फेकलं. या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गट विरुद्ध मनसे अशा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळाबरोबरच शेण फेकतानाचा मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं असतानाच या हल्ल्यावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे थेट आव्हान दिलं आहे. अंधारे यांनी मनसेने उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कनेक्शन समोर आणत टीका केली आहे. 


ठाण्यात बरं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील कार्यक्रमाआधी ताफ्यावर हल्ला आणि गोंधळ घातल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणामध्ये मनसेला डिवचलं आहे. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात तुम्हाला अभय मिळत असल्याने हे असले हल्ले झाले. मात्र इतर ठिकाणी तुम्हाला काहीही करता आलं नाही, अशा आशयाचा टोला त्यांनी लगावला. "मराठवाड्यात तुम्हाला काय झालं होतं? विदर्भात काय झालं होतं? ठाण्यात बरं आठवलं. ठाणं बरं ठरलं तुमच्या तुमच्या कंट्रोल सिच्युएशनमध्ये आहे. जिथे एकनाथ शिंदेंची तुम्हाला मदत मिळू शकते," असं अंधारे यांनी म्हटलं.


अपने इलाके मे तो कुत्ता भी...


पुढे बोलताना अंधारे यांनी, "हे म्हणजे एक उपकंत्राटदार फस्ट्रेट होतो आणि मुख्य कंत्राटदाराकडे तक्रार करतो. मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला सांगतो की ठीक आहे तू माझ्या इलाख्यामध्ये ये. अरे अपने इलाके मे तो कुत्ता भी शेर होता है| मजा तो जब है, जब इलाका तुम्हाला और धमका हमारा होता है|" असा म्हणत अंधारेंनी मनसेला पुन्हा डिवचलं आहे. 


मनसेकडून त्या हल्ल्याला उत्तर?


राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौरा करतायत. यात दोन दिवस ते बीड (Beed दौऱ्यावर होते. राज ठाकरे बीड शहरात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या देखील टाकण्यात आल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचं बोललं जातंय. ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मनसे सैनिकांना ताब्यात घेऊन सोडून दिलं आहे.