Abhishek Ghosalkar Murder Case :  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती दिवसेंदिवस समोर येत आहे. एमएचबी पोलीस ठाण्यात आरोपी मॉरिस नरोन्हा (Mauris Noronha) याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. अमरेंद्र मिश्रा याच्या अटकेनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) देखील प्रकरण चांगलंच तापलंय. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेल्या पोस्टमुळे सध्या खळबळ उडाल्याचं पहायाल मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?


मॉरिसने घोसाळकरांना गोळ्या घातल्याचं फुटेज कुठं समोर आलंय का?? फक्त गोळ्या लागताना दिसल्या, त्या कोणी मारल्या हे दिसलंच नाही. आणि मॉरिस स्वतः सराईत गुन्हेगार होता, तो आधीही तुरुंगात जाऊन आलेला आहे. मग तुरुंगात राहण्याची सवय असताना यावेळी त्याने आत्महत्या का केली असेल?? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.


बरं आत्महत्या केली आहे असं एकवेळ मानलं तरी त्याने स्वतःला चार गोळ्या झाडल्या?? शक्य आहे का हे?? माणूस पहिल्याच गोळीत अर्धमेला होतो, त्यात या मॉरीसने स्वतःवर ४ गोळ्या कशा काय झाडल्या?? अशी प्रश्नांची सरबत्ती झाडली. 


भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज काही तासांत व्हायरल केले गेले, मग यावेळी त्या मॉरीसच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज एक रात्र उलटून गेली तरी का बाहेर येऊ दिलं जातं नाहीये?? दोघांच्या भांडणात तिसराच कोणीतरी आपला राजकीय मार्ग साफ करून गेलाय असं तर काही नाहीये ना?? असा सवाल देखील अंधारे यांनी विचारला आहे.


पोलिसांनी अगदी निःपक्षपाती चौकशी करायला हवी. तरचं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली प्रतिमा आणि पोलिसांची होत असलेली बदनामी थांबण्यास थोडीफार मदत होईल, असा घणाघात देखील अंधारे यांनी उपस्थित केलाय.



दरम्यान, घोसाळकरांच्या हत्येवरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जोरदार कलगितुरा रंगलाय. फडणवीस हे निर्ढावलेले, निर्दयीमनाचे, मनोरुग्ण गृहमंत्री आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील, असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. तर फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका केलीय.