आशीष अम्बाडे,झी मीडिया,चंद्रपूर: नवीन वर्ष , नाताळ आणि सलग सुट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी  व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश फुल्ल झाले आहेत. यंदा देशात आलेल्या परदेशी पर्यटकांनी ताडोबातील श्रीमंती अनुभवण्यासाठी ताडोबाकडे कूच केल्याने सलग सुट्यांच्या या हंगामात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी फुलून गेलाय.  गेले काही वर्षे राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम तुफान गर्दीच्या काळात दिसून येत असून सुमारे ६२५ चौ किमीपसरलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे.


व्याघ्र दर्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 केवळ वाघच नव्हे तर सहसा जंगलात अभावानेच आढळणारे अनेक प्राणी पक्षी ताडोबात सहज दर्शन देत असल्याने ताडोबाला पोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा या गर्दीने उच्चांक केला आहे. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारच्यासफारी महिनाभर आधीच बुक झाल्याने नव्याने ताडोबाची नोंदणी करणा-यांना एखादा महिनातरी  वाट बघावी लागणार आहे. सलग सुट्या , नाताळ  आणि नवीन वर्षात त्याच त्या ठिकाणीभेट देण्याऐवजी आपल्या अनुभवात समृध्द भर घालणा-या ताडोबाची भ्रमंती अनेकांनी पसंत केली आहे. यात राज्य , देश तसेच परदेशातूनही पर्यटकांनी ताडोबाला पसंती दिली आहे. 


पर्यटनाच्या दृष्टीने बंपर


 ताडोबात प्रवेशासाठी ६ प्रवेशद्वारातून रोज साधारण सकाळ-दुपार सत्रात पर्यटक जिप्सी ताडोबात सोडल्या जात आहेत.  तर ताडोबाच्या बाह्य भागातील ( बफर झोन ) वनभ्रमण करण्यासाठी ४मार्गांवर पर्यटक वाहनांना प्रवेश दिला जातो. ताडोबाच्या भ्रमंतीने पर्यटक बेहद्द  खुश आहेत. ताडोबात पर्यटक मोठ्या संख्येत भेट देत असल्याने ऐनवेळी ताडोबाची सैर करण्याचा प्लान आखणाऱ्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. हा हंगाम संपतो न संपतो तोच ताडोबातील पानगळ आणि नंतर 5 महिन्यांचा उन्हाळा प्रारंभ होत आहे. हा हंगाम ताडोबात व्याघ्र दर्शन आणि पर्यटनाच्या दृष्टीने बंपर मानलाजातो. यामुळे उत्तम सोयी आणि मनसोक्त व्याघ्रदर्शन यामुळे ताडोबात पर्यटकांची रेलचेल असणार आहे.