नागपूर- नॉयलॉन मांजामुळं नागपुरात एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. सगीर अहमद  असे नायलॉन मांजमुळे जखमी शिक्षकाचे नाव आहे.त्याचा गळा नायलॉन मांजानं चिरला गेला आहे. गेल्या 15 दिवसातील नागपुरात नायलॉन मांजामुळं गंभीर जखमी झालेला दुसरी मोठी घटना आहे यापूर्वी गेल्या महिन्यात प्राध्यापक राजेश क्षीरसागर नायलॉन मांजामुळे जखमी झाले होते.
         सागिर अहमद हे आशनगर येथील किदवई शाळेत शिक्षक आहे. बुधवारी सायंकाळी शाळेतून ताजाबाद येथील आपल्या घरी स्कुटीने परत येत होते. ताजाबाद मेन गेटसमोर उमरेड मार्गावर अचानक त्यांच्यासमोर नायलॉन मांजा आला आणि तो त्यांच्या गळ्यात अडकला.लगेच त्यांनी खबरदारी घेऊन हाताने मांजा पकडला आणि तो आरशात अडकविला. परंतु तोपर्यंत मांजामुळे त्यांची मान रक्तबंबाळ झाली होती. त्यांच्या डाव्या हाताचे बोट जखमी झाले.नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला .
जखमी सागिर अहमद हे या घटनेमुळे पुरते धास्तावले आहे. नायलॉन मांजामुळे त्यांना नागपूरच्या रस्त्यावर गाडी चालवायला भीती वाटत आहे.  माझं नशिब बलवत्तर म्हणून माझा  जीव वाचल्याच ते सांगतात.प्रशासनाने मांजा विक्रेते व वापर करण्याऱ्या विरोधात कठोर पावले  उचलावी अशी मागणी केल आहे.                                                                                                                                                                                                                                                             यापूर्वी गेल्या महिन्यात नायलॉन मांजामुऴे नागपुरातील प्राध्यापक राजेश क्षीरसागर नायल़ॉन मांजामुळे जखमी झाले. सदर उड्डाणपुलावर दुचाकीने जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी तातडीनं गळ्यातील मांजा दूर सारला मात्र यामध्ये त्यांच्या  उजव्या हाताच्या दोन बोटाला गंभीर दुखापत झालीय.त्यांच्या दोन बोटं  मांजामुळं कापल्या गेलीत. प्राध्यापक क्षीरसागर यांचा जीव बचावला,मात्र या घटनेमुळं ते पुरते हादरले. मांजानं उजव्या हाताचा मधले बोट आणि अंगठा कापला गेल्याने त्यांना  दुखापत झाली. शिवाय गळ्यावरही गंभीर इजा झाली होती. गेल्या काही वर्षाच नायलॉन मांजानं अनेक निरापराधांचा बळी घेतला,तर अनेकजण गंभीर दुखापत झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल


एकीकडे जीवघेण्या नायलॉन मांजाविरुद्ध नागपूर पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. अनेक विक्रेत्यांना अटक केली असताना  ऑनलाईन विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची करडी नजर आहे. एका ई कॉमर्स  कंपनी  कंपनीच्या वेबसाईटवर  नॉयलॉन मांजाची विक्री  होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .या ई-कॉमर्स कंपनीच्या वेबसाइटवरून पोलिसांनी नायलॉन मांजच्या चक्रीची ऑर्डर केली. या कंपनीने ऑर्डर केलेल्या पत्त्यावर चक्री पाठवली.त्यानंतर पोलिसांनी सदर पोलीस स्टेशन गुडगाव स्थित  ई-कॉम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनांमुळे  नायलॉन मांजा विक्रीला प्रतिबंध असला तरीही विक्रेते अजूनही मांजाची विक्री  करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.