Rajan Salvi News : रत्नागिरीतील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी चौकशी होणार आहे. त्यांची ही चौथ्यांदा चौकशी होत आहे. आमदार साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. दरम्यान, आपल्याला त्रास देण्यासाठी हा सगळा खटाटोप घातला जात आहे. चौकशीला सहकार्य याआधी केला आहे. कागदपत्रेही दिली आहेत, असे असताना पुन्हा पुन्हा बोलावून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका याआधी राजन सावळी यांनी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली. आता त्यांच्या कुटुंबीयांनाही चौकशीसाठी हजर राहा, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आमदार साळवी कुटुंबासह  अलिबाग येथे चौकशीसाठी हजर राहणार आहेत. साळवी कुटुंबीय मुंबईहून अलिबागला येणार आहेत. मुंबईतून भाऊचा धक्का येथून उद्या सकाळी 11.20 वाजताच्या रोरो बोटीने अलिबागकडे निघणार आहेत. तसेच त्यांनी उद्या शनिवारी देखील दिवसभर साळवी कुटुंबाची अलिबाग एसीबी समोर चौकशी होण्याची शक्यता आहे.


याआधी  राजन साळवी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात  (ABC) आधीच्या चौकशीदरम्यान मागितलेली मालमत्ताविषयक कागदपत्रे सादर केलीत. तसेच ते स्वत: हजर राहून चौकशीला सामोरे गेले होते. त्यानंतर 20 जानेवारी रोजी  साळवी यांची 6 तास एबीसी अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. तसेच साळवी यांना 22 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहायला सांगितले होते. त्यावेळी ते उपस्थित राहिले होते.


राजन साळवी यांना मालमत्तेबाबत एबीसीने डिसेंबर महिन्यात चौकशीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर आमदार साळवी लाचलुचपत कार्यालयात येऊन चौकशीला हजरही झाले होते. त्यानंतरही त्यांची चौकशी सुरुच आहे. 20 जानेवारीला त्यांच्याविषयी, तसेच कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी केली होती. आमदार साळवी यांनी सादर केलेली कागदपत्रांबाबत समाधान न झाल्याने इतर कागदपत्रे सादर करण्यास एबीसीने त्यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी अलिबाग कार्यालयात हजर राहून कागदपत्रे सादर केलीत. त्यानंतरही त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यावेळी कुटुंबीयांची चौकशी करण्यात येणार आहे.


दरम्यान, रत्नागिरी शहरातील मालमत्तेपैकी घराचे मोजमापन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. एसीबीने साळवी यांचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन केले आहे. त्यात घर आणि हॉटेलचं क्षेत्रफळ, एकूण जमिनिची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंगसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानंतरही चौकशीचा ससेमीरा सुरुच आहे. या चौकशीनंतर राजन साळवी यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, माझ्यावर दबाव आणला जात आहे. मात्र, मी कोणत्याही दबाबावा बळी पडणार नाही. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहे. मला मुद्दाहून हा त्रास दिला जात आहे.