जालना : येथे मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation) मागणीसाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. साष्ट पिंपळगावतल्या आंदोलनाचा आजचा १० वा दिवस आहे. मात्र, आंदोलन करणाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. एकूण चार आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. तर तीन जणांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. काल दोन आंदोलक आणि आज आणखी दोन आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. बेशुद्धावस्थेत असलेल्या एका आंदोलकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलक ठाम आहेत. आज पहाटे आणखी दोन आंदोलकांची तब्बेत बिघडली आहे. कालच्या आंदोलनादरम्यान दोन आंदोलकांची तब्बेत बिघडली होती. तब्बेत बिघडलेल्या एकूण चार आंदोलकांपैकी तीन जणांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.


एक आंदोलक बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा आणखी आंदोलन तीव्र करू, असा ईशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.