मुंबई : ओखी वादळाचा कोकणाला जोरदार फटका बसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे केवळ कोकणच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजालाच फटका बसला आहे. मात्र, प्रामुख्याने अंबा, स्ट्रॉबेरी, कांदा, द्राक्ष पिकांना फटका बसल्याचे पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळपासून मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या धाराही बरसत आहेत. सकाऴी रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावर समुद्र खवळलेला बघायाला मिळतोय. रात्री रिमझिम पाऊस झाला. पण सकाळापासून पावसानं विश्रांती घेतलीय. पण ढगाळ वातावरण आहे. मात्र, या पावसानं अंबा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. झाडांचे मोहोर गळाले आहेत. त्यामुळे यंदा अंबा महागणार असे चिन्ह आहे.


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. काही भागात मुसळधार पाऊस कोसळलाय. सध्या पाऊस थांबला असला तरी जोरदार वारे वाहतायत. या वातावरणामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय.तसेच फळपिकांनाही मोठा फटका बसताना दित आहे. अर्थात, या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.