महाराष्ट्रातील चमत्कारिक वाळणकुंड, नदीच्या डोहात छुप कुंड, पर्यटकांना पाहताच खालून वर येतात माशांचे 7 थर
महाराष्ट्रात एक असं चमत्कारिक पर्यटनस्थळ आहे जिथे प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीच्या डोहात एका छुपा कुंड आहे. नदी पात्र कोरडे झाले तरी या कुंडातील पाणी कधीच आटत नाही.
Walan Kund Mahad : महाराष्ट्रात अशी असंख्य पर्यटनस्थळ आहेत जी पर्यकांसाठी अपरिचीत आहेत. यामुळेच ही पर्यटनस्थळ फारशी लोकप्रिय झालेली नाहीत. असचं एक अपरिचीत पर्यटनस्थळ कोकणात आहे. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात असलेल्या या अपरिचित पर्यटनस्थळाचे नाव आहे वाळणकुंड. नदीच्या डोहात छुपं कुंड आहे. हेच कुंड वाळणकुंड म्हणून ओळखले जाते. हे कुंड माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून ओळखले जातात.
हे देखील वाचा... मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेलं जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ; अथांग समुद्र आणि बरचं काही...
सावित्री ही कोकणातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वाहणारी सावित्री नदीचे उगमस्थान महाबळेश्वरजवळ आहे. महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावणारी सावित्री नदी महाडमार्गे पुढे बाणकोटजवळ समुद्रास मिळते. घोड, गांधारी व काळ व नागेश्वरी या तिच्या उपनद्या आहेत. यापैकी काळ नदी कोकणदिव्याजवळील कावळ्या घाटाजवळ उगम पावते. याच काळ नदीच्या डोहात हे छुपं वाळणकुंड आहे.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील विज्ञानाला आव्हान देणारे ठिकाण! धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी, 12 महिने वाहतात गरम पाण्याचे झरे
प्रचंड वेगाने वाहणाऱ्या काळ नदीच्या डोहात असलेला वळणकोंड हा रुद्रभिषण डोह हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला जातो. महाडपासून सुमारे बारा कि.मी. अंतरावर असलेला वळणकोंड डोह येथील माशांसाठी प्रसिद्ध आहे. या डोहातील मासे पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात.
हे देखील वाचा... भारतातील श्रीमंत लोक नेमकी कशात गुंतवणूक करतात? समजल्यावर शॉक व्हाल; संपूर्ण जगालाही जाणून घेण्यात इंटरेस्ट
नदीत असलेल्या खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. या डोहातच हा वाळणकुंड आहे. येथील पाणी कधीही आटत नाही असे सांगितले जाते. उन्हाळ्यात नदी पात्र कोरडे झाले तरी या कुंडात पाणी असते. या कुंडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले मासे. येथील मासे आपली जागा सोडून कोठेही जात. उन्हाळा असो की पावसाळा कोणत्याही वातावरणाचा या माशावंर काहीच परिणाम होत नाही.
नदीवर एक झूलतापूल बांधण्यात आला आहे, त्यावर उभे राहून पर्यटक मासे पाहतात. या डोहात पर्यटाकांनी खाण्याचा पदार्थ टाकला की माशांचे सात थर खालून वर येतात. प्रथम लहान व नंतर मोठे मासे अशा प्रकारे माशांचा क्रम असते. या कुंडातील मासे खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत. या माशांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते. नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे. वाळणकुंड परिसर खुपच सुंदर आहे. मुंबई वरून येत असल्यास पनवेल ते महाड असा 127 km चा प्रवास आहे. महाड वरून बिरवाडीमार्गे सरळ पुढे गेल्यास थेट वाळणकुंडापर्यंत जाता येते.