भारतातील श्रीमंत लोक नेमकी कशात गुंतवणूक करतात? समजल्यावर शॉक व्हाल; संपूर्ण जगालाही जाणून घेण्यात इंटरेस्ट

भारतातील श्रीमंत लोक कोणत्या गोष्टींवर पैसा खर्च करतात तसेच कशात गुंतवणूक करतात याबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. जाणून घेऊया काय आहे या रिपोर्टमध्ये.

वनिता कांबळे | Updated: Nov 27, 2024, 07:43 PM IST
भारतातील श्रीमंत लोक नेमकी कशात गुंतवणूक करतात? समजल्यावर शॉक व्हाल; संपूर्ण जगालाही जाणून घेण्यात इंटरेस्ट title=

Global Entrepreneurial Wealth Report 2024 : जगभरातील श्रीमंताच्या यादीत भारतातील श्रीमंत व्यक्तींचा देखील समावेश आहे. भारतातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. यामुळेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारतातील श्रीमंत व्यक्तींची नेहमीच चर्चा असते. यामुळेच  भारतातील श्रीमंत लोक नेमकं कशात गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यात जगभरातील श्रीमंतांना देखील इंटरेस्ट. एक बिझनेस रुपोर्टमध्ये भारतीय सर्वाधिक कशात गुंतवणूक करतात हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच भारतील श्रीमंत सर्वाधिक पैसा कशावर खर्च करतात हे देखील या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.  

हे देखील वाचा... 7000 कोटींची FD, भारतातील सर्वात श्रीमंत गाव, रुपयामध्ये नाही तर डॉलरमध्ये पैसा कमावतात; यांचा व्यवसाय काय?

HSBC ने Global Entrepreneurial Wealth Report 2024 जारी केला आहे. यात जगभरातील श्रीमंत लोक कशात गुंतवणूक करतात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. भारतीय कशात गुंतवणूक करतात हे समजल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.  भारतातील श्रीमंत लोक नेमकं कशात गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यात संपूर्ण जगाला देखील इंटरेस्ट आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 2 मंदिर भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल

भारतातील श्रीमंत लोक सर्वाधिक गुंतवणूक मालमत्ता अर्थात रियलइस्टेट क्षेत्रात करत असल्याचे Global Entrepreneurial Wealth Report 2024 रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.  भारतीयांची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक जागतिक सरासरीच्या केवळ 51 आहे.  61 टक्के भारतीय श्रीमंतांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून भविष्यात मोठा नफा मिळेल अशी खात्री 98 टक्के भारतीय श्रीमंतांना आहे. भारतातील 82 टक्के श्रीमंत स्टॉक, बाँड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. तसेत 10 आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील भारतीय श्रीमंताना गुंतवणूक करण्यात इंटरेस्ट आहे.  

भारतातील श्रीमंत लोक कशात गुंकवणूक करतात यासाह भारतातील श्रीमंत कोणत्या गोष्टींवर वर सर्वाधिक पैसा खर्च करतात हे देखील या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. 56 टक्के भारतीय श्रीमंत लक्झरी वस्तूंवर खर्च करतात. यात ब्रॅंडेड कपडे, महागडे फोन, महागड्या कार, बाईक्स आदी वस्तूंचा सामावेश आहे. तर, 44 टक्के भारतीय लक्झरी लाईफस्टाईल म्हणजेच महागड्या हॉटेलमध्ये पार्टी, लग्नसोहळ्यासारखे शाही समारंभ तसेच इंटरनॅशन टूर तसेच युनीक अशा अनुभवांवर पैसा खर्च करतात.