नाशिक : चुलत भावाचा खून करून 'दृश्यम सिनेमा' स्टाईलने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. विकी भुजबळ उर्फ टेंबऱ्याचा आईसक्रीम फुकट देण्यावरुन त्याच्या चुलत भाऊ रोहन भुजबळशी वाद झाला होता. या वादातून रोहन आणि त्यांच्या साथीदारांनी टेंबऱ्याला दारू पाजून हिरावाडी शिवारातील गुंजाळ मळ्यातल्या चेंबरमध्ये टाकून दिले. चार दिवसांनी परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. सुरुवातीला टेंबऱ्याची हत्या की अपघात अशा गोंधळात पोलीस होते. पण नंतर पोलिसांनी कौशल्यानं तपास करीत रोहन आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुचाकीवर घेऊन जात त्याला हिरावाडी परिसरातील गुंजाळ मळ्यात असलेल्या गटारीच्या चेंबरमध्ये जीवंत गाडण्यात आले. चेंबर १५ ते २० फूट खोल असल्याने टेंबर्‍याचा त्यात मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. चेंबर परिसरात दुर्गंधी पसरल्याने कुत्रे त्याठिकाणी फिरकू लागले त्यामुळे मळेकर्‍यांना चेंबरमध्ये काहीतरी असल्याचा संशय आला आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.


त्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला, चार ते पाच दिवस पाण्यात मृतदेह असल्याने ओळख पटत नव्हती. त्यामुळं पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र पुढील तपासात हातावर टेंबर्‍या नाव गोंदण्यात आले होते ते दिसून आले आणि त्यावरून सराईत टेंबर्‍याच असल्याचे निष्पन्न झाले. मात्र शवविच्छेदन अहवालात कुठलीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने पोलिसही चक्रावून गेले होते. मात्र नंतर पोलिसांनी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने नाशिक पोलिसांनी सिनेमास्टाईल तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या.