INDIA alliance Mumbai meeting : शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली. या सभेत  शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, सपाचे नेते अखिलेश यादव असे इंडिया आघाडीतले बडे नेते एकाच मंचावर उपस्थित झाले. या सभेच्या निमित्तानं इंडिया आघाडी शक्तिप्रदर्शन करून लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप या सभेने झाला. यावेळी उद्ध ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपवरप जोरदार निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 पारचा आकडा पाहिजे असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.  भाजप हा एक फुगा आहे. या फुग्यामध्ये हवा भरण्याचे काम आम्ही केले याचं दु:ख होतेय.  फक्त 2 जागा होत्या आता हे 400 पारची घोषणा करत आहेत. विरोधक हद्दपार करण्याचा यांचा डाव आहे.  


मोदींना 400 पार जागा हव्यात कारण त्यांना संविधान बदलायचे. काश्मीर येथे संविधान संपले. तुम्ही पर्यटक येतात जातात पण येथे संविधान कायदे संपले आहेत. आम्हाला रस्तावर येवून दिले जात नाही असा हल्लाबोल मेहबूबा मुफ्ती यांनी केला. 


भारताची सद्यस्थिती बदली पाहिजे - शरद पवार


भारताची सद्यस्थिती बदली पाहिजे. आपणांस आश्वासन देत फसवले त्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली.  ज्याच्या हातात आता सत्ता त्यांनी शेतकरी महिला तरुण आश्वासन दिली पण वास्तविक काहीच केले नाही. त्यांना दूर करावे लागेल. मोदीजी खोटी गॅरंटी जी चालणार नाही. लोकांना फसवले. त्यांना थांबविले पाहिजे असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली.  


पंतप्रधान मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी -  तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल


पंतप्रधान मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी आहेत, अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी जोरदार हल्ला चढवला. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते. मोदींना हरवायला नाही, तर संविधान वाचवायला आणि देशात फूट पाडणा-या विचारधारेला हरवायला एकत्र आलोय, असं यादव म्हणाले.


फारूक अब्दुला  


भारताला वाचवायचे असेल सर्व धर्म टिकावायचे काम आपले आहे.  ईव्हीएम हटावं आणि पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक आम्ही आणू. आपले सरकार आले त्यावेळेस निवडणूक आयोग ही मुक्त होईल.  इंडिया मजबूत राहीला पाहिजे येथील माणुसकी टिकवणे आपले काम आहे असं फारूक अब्दुला  म्हणाले.


राहुल गांधींचे शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन 

राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. क्रेनमधून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार घातला. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेतलं. राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर हार, फुलं अर्पण करत नमस्कार केला. राहुल गांधींबरोबर प्रियंका गांधींनीही बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेतलं. आणि आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. 


राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरेंची उपस्थिती हा शिवसेनेसाठी काळा दिवस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका


राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरेंची उपस्थिती हा शिवसेनेसाठी काळा दिवस आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ज्या राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली, त्याच राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. आता गर्व से कहो हे कसं म्हणणार, असा सवालही शिंदेंनी विचारलाय.