पुणे : Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक बघायला मिळाली आहे. कोयत्याने केक कापणं चौघांना महागात पडले आहे. बर्थडे बॉयसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, याआधी पुण्यात तलवारी दाखवून परिसरात दहशत माजविण्यात आली होती. आता कोयत्याने कापला केक कापल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच चौघांना अटक झालेय. ( Cut birthday cake with Koyta in Pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील मुंढवा परिसरात दहशत माजवण्यासाठी तरुणांनी तलवारीने केक कापला. इतकच नाही तर त्यांनी तलवारी दाखवून परिसरात दहशत देखील माजवली. त्यांचा हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. बर्थडे बॉयसह तिघांना अटक करण्यात आली आहे.


पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकं वर काढतांना पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार मुंढवा येथील केशवनगर भागातून समोर आला आहे. केशव नगर परिसरातील राजमाता जिजाऊ चौकात काही तरुणांनी एकत्र येत वाढदिवसाचा केक कोयत्याने कापल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तलवारी दाखवून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.



या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून या प्रकरणी पोलीस कर्मचारी रमेश उगले यांनी फिर्याद दिली आहे. वीरेंद्र बाजीराव सस्ते (18), शशांक श्रीकांत नागवेकर (19), समीर विश्वजीत खंडाळे (21, तिघे रा. केशवनगर, मुंढवा ), सुखविंदरसिंह पप्पूसिंह टाक (19, रा. हडपसर, गाडीतळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे काही साथीदार फरार असून अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.