माळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटक
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते.
Malshej Ghat : पावसाळ्यात माळशेज घाट पर्यटकांना आकर्षित करतो. यामुळे मोठया संख्येने पर्यटक माळशेज घाटात पावसाळी सहलीचे आयोजन करत आहेत. मात्र, हाच माळशेज घाट पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. माळशेज घाटात थरार पहायला मिळाला. माळशेज घाटात असलेल्या धबधब्याच्या टोकावर काही पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पर्यटनासाठी आलेल्या 14 ते 15 पर्यटकांना रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. माळशेज घाटात पावसाळी पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते. रविवारच्या सुट्टीमुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरातून माळशेज घाटात पर्यटनासाठी हे 14 ते 15 पर्यटक आले होते. मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह देखील वाढला. हे सर्व पर्यटक धबधब्याच्या एका टोकाला अडकून पडले होते. महामार्ग पोलीस ठाणे ग्रामीण यांनी या सर्व पर्यटकांचे रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप पणे सुटका केली.
राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव खुलून गेलंय. माळशेज घाटातही निसर्ग बहरलाय... हिरवागार निसर्ग...दाटून आलेले ढग...थंडगार सोसाट्याचा वारा सारं काही आल्हाददायक आहे...
लोणावळ्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इथला निसर्ग बहरलाय. सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून धबधबे प्रवाहित झालेत. आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी पर्यटकांची लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी वाढू लागलीय.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झालीये... लोणावळ्य़ात विकेंडला मोठ्या संख्येनं नागरिक पर्यटनासाठी आल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याय..... पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरुये.....