Thane Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ठाणे महापालिकेअंतर्गत सुवर्णसंधी चालून आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत (NUHM) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून अर्ज प्रक्रिया सुरु आहे. ही कंत्राटी स्वरुपाची भरती असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पदभरतीअंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 28 रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहेत.


पूर्णवेळ अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी 70 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. 


औषध निर्माता पदासाठी डी फार्मा/बी फार्माची पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करु शकतात. या पदासाठी 65 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19 हजार 584 रुपये पगार दिला जाणार आहे. 


एक्सरे तंत्रज्ञ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकडे बारावी आणि रेडिओलॉजीतील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी 65 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 17 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी गुगल लिंक फॉर्म देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत हा अर्ज भरुन पाठविणाऱ्या उमेदवारांचा नोकर भरतीसाठी विचार केला जाणार आहे. 


उमेदवारांनी गुगल फॉर्म डाऊनलोड करावा. त्यात दिलेली माहिती भरावी आणि त्यावर सही करुन पाठवावा. उमेदवारांना आपला गुगल फॉर्म आणि सोबत लागणारी महत्वाची कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- 400 602 या पत्त्यावर पाठवायचा आहे. 


उमेदवारांनी गुगल फॉर्ममध्ये अचूक माहिती भरावी. भरलेली माहिती अंतिम समजली जाणार आहे. नंतर उमेदवारांना कोणता बदल करता येणार नाही. खोटी माहिती भरल्याचे आढळल्यास उमेदवारांचा नोकर भरतीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.


27 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या. उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अथवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्षात येऊन अर्ज देता येणार आहे. 


गुगल फॉर्मच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा