मुंबई : आरोग्य विभागाच्या परिक्षेनंतर आता म्हाडाच्या परिक्षांचा गोंधळ उडाला आहे. आज होणारी म्हाडा भरती परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव आणि तांत्रिक अडचणी मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांना नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सर्व परिक्षा पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यात होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज म्हणजेच रविवारी म्हाडा भरतीसाठी परिक्षा होणार होती तसंच येत्या आठवड्यात वेगवेगळ्या पदासाठी परिक्षा होणार होत्या. मात्र या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


डिसेंबर महिन्यात या परीक्षा होणार नाही नसून थेट जानेवारी महिन्यात परिक्षा होतील अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 



म्हाडा परिक्षेचे पेपर लीक झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारी आल्यानंतर परिक्षांबाबतचा हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.


या आधी आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे गोंधळ झाला होता. या परीक्षाही पुढे ढकल्या होत्या त्या प्रकरणात काही वरिष्ठ आरोग्य विभागात कर्मचारी अधिकरी अटक झाली होती.


आता म्हाडा परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार यावर यामुळे विद्यार्थी नाराज झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री उशीरा म्हाडा परिक्षा रद्द निर्णय मंत्री यांनी घेतला.