tulja bhavani temple dharashiv : तुळजाभवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी... छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्यदैवत...साडेतीन पिठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ... मात्र आई तुळजाभवानीचं मंदिर यावेळी वेगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत आलंय.. तुळजाभवानी देवीला चक्क चॉकलेटचा हार घालण्यात आलाय.. एका भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार पुजा-याने मंदिर संस्थानच्या परवानगीने देवीला घातल्याचा आरोप आहे. त्यामुळे चॉकलेटचा हार घातल्याच्या दाव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवीचा गाभारा हा फक्त फुलांचे हार आणि फळांनी सजवला जातो.. तुळजाभवानी मंदिर संस्थानला देऊळ कवायत कायदा लागू आहे... मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप केला जातोय. तुळजाभवानी देवी मंदीर संस्थान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादाच्या भोव-यात सापडलंय. मंदिर संस्थानातल्या 50 पेक्षा जास्त महत्त्वाच्या फाईल्स गायब असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. त्याआधी देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घातल्यानं संस्थानचा बेजबाबदार कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 


आजपासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचं अखंड दर्शन सुरु करण्यात आलंय.. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनसाठी येणा-या वारक-यांना दर्शन मिळावं यासाठी देव आजपासून अखंडपणे उभे राहणार आहेत.. देवाचा आणि मातेचा पलंग काढण्यात आलाय.. तसंच देवाला पाठीमागे कापसाचा लोड आणि रुक्मिणी मातेला कापसाचा तक्क्या लावण्यात आलाय... त्यामुळे आता भाविकांना विठुरायाचं 24तास दर्शन घेता येणार आहे. 


संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर लोणंदमध्ये पालखीचा विसावा असतो.... लोणंदमधील बाजार पटांगणावर माऊलीची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आलीये... हजारो वारकरी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आलेय.... आजचा मुक्काम आटोपून उद्या माऊलीची पालखी तरडगावला मार्गस्थ होणारे...वाटेत चांदोबाचा लिंब या ठिकाणी पाहिलं उभ रिंगण पार पडणारे...