तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी मोजावे लागणार ३०० रुपये
नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आत तुम्हाला ३०० रुये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी १०० रुपये मोजावे लागत होते त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलीय.
उस्मानाबाद : नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आत तुम्हाला ३०० रुये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी १०० रुपये मोजावे लागत होते त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलीय.
घटस्थापनेपासून ते अश्विन पोर्णिमेपर्यंत ही दरवाढ लागू राहणार आहे. महत्वाचं म्हणजे या पूर्वी जे निशुल्क दर्शन होते त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. निःशुल्क दर्शन नेहमी प्रमाणे दर्शन मंडपद्वारे सुरूच असणार आहे.
फक्त व्ही आय पी दर्शन बंद करून त्या भक्तांना अभिषेक रांगेतून पेड दर्शन दिले जाते त्या भक्तांना आता १०० रुपयांऐवजी ३०० रुपये मोजावे लागणार आहेत. नवरात्र काळात गर्दीचा गैरफायदा घेऊन, व्ही आय पी दर्शन देतो म्हणून भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना या निर्णयामुळे चाप बसणार आहे.