Uddhav Thackeray On Shinde Group MLA: राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटून बाहेर पडल्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. अशाच प्रकारे एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आले तर? या प्रश्नाला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारलेल्या या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिलं. "माझ्याकडे येण्याची त्यांची हिंमत नाही. आले तर वगैरे विषयच नाही. ते येऊच शकत नाही. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव ठाऊक आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजे बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.


खिशात राजीनामे घेऊन मी फिरायला सांगितलं नव्हतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी बाळासाहेबांचे विचार सोडले. हे सोडलं, ते सोडलं म्हणतात पण हे सारं ढोंग आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही पडलो असं म्हणाले आता राष्ट्रवादीच्या म्हणजेच अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेल्यात. 2014 ते 2019 मध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला. त्यावेळी ते तथाकथित मंत्री होते. मी न सांगता बडेजाव मारत होते की, आम्ही खिशात राजानीमे घेऊन फिरतो. राजीनामा घेऊन फिरायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? का वेळ आली होती तुमच्यावर?" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.


नक्की वाचा > मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला...'


माझ्याविरोधात संपूर्ण भाजपा


"आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजपा आहे. त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय? पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे, चिन्ह चोरलं आहे, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत," असं म्हणत माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा साधला. 


नक्की वाचा >> पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा; म्हणाले, 'तुमचं पटत नसेल तर...'


राहुल गांधींचं कौतुक


"राहुल गांधींना यापूर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज-गैरसमजच जास्त होते. ‘ते’ असे आहेत... ‘ते’ तसे आहेत... ‘ते’ हिंदुद्वेष्टे आहेत. प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की, राहुल गांधी समजून घेत आहेत. ऐक आहेत. त्यांना जे काही वाटतंय ते हळुवारपणे बोलत आहेत. तसेच नुसतं ऐकून घेत नाहीत तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांच्या समोर मांडतात सुद्धा. अशा पद्धतीनेच जर का हे पुढे सुरू राहिलं तर मला वाटत नाही की, पुढे काही अडचण येईल," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचं कौतुक केलं.