वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने  शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अडचणीत वाढ झालीय. निवडणूक आयोगाने (election commission) शनिवारी रात्री उशिरा शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण (bow and arrow) चिन्ह गोठवण्याचा (froze) हंगामी आदेश दिला. यानंतर आता शिवसेनेचे (Shivsena) दोन तुकडे होण्यामागे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याही काही चुका असतील अशी टीका राष्ट्रवादीच्या (NCP) बड्या नेत्याने केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ खडसे (eknath khadse) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.



"एकमेकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले यापेक्षा धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही चुका उद्धव ठाकरे यांच्यासुद्धा असतील. पक्षप्रमुख असताना काही चुका होऊ शकतात. परंतु एखादी चूक एवढी मोठी नसावी की त्यामुळे पक्ष संपून टाकावा. तुम्ही संपले आणि ते ही संपले. अशी स्थिती निर्माण होता कामा नये. न्यायालयाचा निर्णय काही वेगळा होईल असं मला वाटत नाही," असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


हे ही वाचा : "कदाचित नवीन चिन्ह..."; धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया



हे ही वाचा : "शिवसेनेला पक्षाचे नाव वाचवता येऊ शकतं"; प्रकाश आंबेडकर यांचा दावा


"बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली. त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठाही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली.  वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे झाले असून शिवसेना ही दुभंगली गेली आहे.  हे राज्याच्या दृष्टीने ही योग्य नाही व शिवसेनेच्या दृष्टीने ही योग्य नाही. मात्र दुसरीकडे यामुळे भाजपला मजबूत होण्याची संधी आहे," असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले.