नितेश महाजन, झी 24 तास, जालना :  राज्यात सध्या राजकीय वातावरण गरम असताना रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. आषाढी एकादशी निमित्त दानवे यांनी वारकऱ्यांसाठी एक खास गोष्ट केली. त्यामुळे दानवे यांची चर्चा होत आहे. दानवे आपल्या भाषणांमुळे आधीच चर्चेत असतात, आता या व्हिडीओमुळे चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दानवे यांनी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या भाविकांसाठी एका हॉटेलवर चहा बनवला.


आषाढी एकादशी निमित्त जालन्यातील शिरसगाव मंडप येथील सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूर मध्ये लागले आहे. दानवे यांनी वाघ यांचं हॉटेल पाहताच हॉटेलवर जाऊन स्वतः भाविकांसाठी चहा केला. त्यांनी तयार केलेला चहा भाविकांना वाटायला सांगितला.


याआधी सुप्रिया सुळे यांचा भाविकांच्या सेवेत रमलेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी भाविकांसाठी भाकरी केली होती. त्यांच्या व्हिडीओचीही सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. त्यानंतर आता दानवेंचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.