Unseasonal Rain : जीवघेणा पाऊस; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी
Unseasonal Rain : अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत.
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. त्यातच आता हा पाऊस जीवघेणा ठरताना दिसत आहे. अकोला येथे वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परभणीतही वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत. मंदिर परिसरात टिनाचा शेड बांधण्यात आला होता. या टिन शेडच्या मध्यभागी निंबाचा मोठा वृक्ष आहे. या वृक्षावर वीज कोसळल्याने हा संपूर्ण शेड जमीनदोस्त झाला.
यामुळे या खाली उभे असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत. शेड खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आला असून जखमींवर पारस , बाळापूर येथील प्राथमिक उपचार केंद्र येथे उपचार सुरू आहेत.
वीज कोसळून दोघांचा मृत्यू
शनिवारी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसासह दोन्ही जिल्ह्यात पाच ठिकाणी वीज कोसळली आहे. यात दोघांचा मृत्यु झाला आहे. तर, दोन जनावरे ही दगावली आहेत. परभणीच्या मानवत तालुक्यातील मांडेवडगाव परिसरात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यावेळी एका 56 वर्षीय इंदुमती नारायण होंडे या महिलेच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. त्या शेतामध्ये कापूस वेचणी करत होत्या, तर दुसरी वीज कोसळण्याची घटना जिंतूर तालुक्यातील कौडगाव येथे घडली, सुभाष घुगे यांच्या शेतात बांधलेल्या म्हशीवर वीज कोसळल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथील तरुण शेतकरी पिराजी चव्हाण यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ते हळद काढणीसाठी शेतात गेले होते, तर दुसरी घटना औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे घडली आहे. गोजेगाव येथील शेतकरी विश्वनाथ महादराव ढवळे यांच्या शेतात बैलजोडी वर विज पडली असून त्यांचा एक बैल दगावला आहे. तर, तिसरी घटना हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहातील पाठीमागे लिंबाच्या झाडावर वीज पडली आहे.
कन्नड तालुक्यात पावासाचे थैमान
छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. कन्नड तालुक्यतील जेहुर गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त वेळ तुफान गारपीट झाली. सगळीकडे गारांचा सडा पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात सलग तिस-यांदा अवकाळी पाऊस पडला आहे.