कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन ?
Mumbai to Goa Vande Bharat Train : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. (Vande Bharat Express) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यामुळे ही गाडी नियमित आता धावणार आहे.
Mumbai to Goa Vande Bharat Semi-High-Speed Train : मुंबईतून कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी. कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. (Vande Bharat Express) मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा कंदील दाखवणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will flag off the Mumbai Goa Vande Bharat train today) त्यामुळे ही गाडी नियमित आता धावणार आहे. सेमी-हाय-स्पीड ट्रेन मुंबई ते गोवा प्रवास केवळ 7 तासात होणार आहे.
मुंबई - गोवा मार्गावर यशस्वी चाचणी
मंगळवारी मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई अशी वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होते. 180 किमी प्रतितास वेगाने धावणारी वंदे भारत ट्रेन मुंबईतील सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरुन सकाळी 5:30 वाजता निघाली आणि दुपारी 12.50 वाजता गोव्याच्या मडगाव स्थानकावर पोहोचली. त्यानंतर दुपारी 1.15 वाजणाच्या सुमारास मडगावहून निघालो आणि रात्री 8.50 वाजता सीएसएमटीला पोहोचली. सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी धावत नसल्याने या ट्रेनची सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा रॅक वापरुन चाचणी घेण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतून चौथी वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन सुटणार
मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा सुखद आणि गारेगार प्रवास होणार आहे. गोव्यात केवळ सात तासाच पोहोचता येणार आहे. मुंबईला चौथी वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. मुंबईत आतापर्यंत तीन वंदे भारत गाड्या धावत असून आहेत. मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावत आहेत. आता मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी चौथी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असेल.
मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या 7 तासात
मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट रेल्वेला प्रवास पूर्ण करण्यासाठी 8 तास लागतात. त्याचवेळी, वंदे भारत सुरु होईल तेव्हा हा प्रवास फक्त 7 तासांचा असेल. आता पंतप्रधान मोदी आज नियमित सुरु होणाऱ्या सेमी-हाय-स्पीड ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहे. त्यामुळे या गाडीने आता प्रवास करणे शक्य होणार आहे. याआधी कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी आणि तेजस या गाड्या धावत आहेत. या गाड्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन या गाडीची भर पडणार आहे. ही संपूर्ण वातानुकुलित रेल्वे असणार आहे आणि तिचा वेगही जास्त असणार आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास केल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.