Shivadi Nhava Sheva Sea Link Accident: शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे 12 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. मुंबईसाठी गेमचेंजर ठरणाऱ्या या सागरी सेतूवर लोकार्पणाच्या अवघ्या काही दिवसांतच अपघात घडला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतेय. अपघाताचा थरार हा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर रविवारी कारचा थरारक अपघात घडला आहे. न्हावा शेवा पोलिसांनी या प्रकरणी बेदरकार गाडी चालवल्याप्रकरणी 32 वर्षांच्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, आद्याप तिचे स्टेटमेंट घेण्यात आलेले नाही. ही महिला आणि तिच्यासोबत अन्य एक व्यक्ती सागरी सेतूवरुन पनवेलच्या दिशेने जात होती. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या वेळेस झारा साकीर नावाची महिला  मुंबईहून पनवेलला जात होती. प्राथमिक माहितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं कार दुभाजकाला धडकली आणि दोनदा पलटी झाली. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा संपूर्ण घटनाक्रम चित्रीत झाला आहे. कारचा वेग जास्त असल्याने दुभाजकाला धडकून कार पालटी झाली. तसंच, सुदैवाने दोन्ही प्रवाशांनी सीट बेल्ट लावल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. दोन्ही प्रवाशांना कोणत्याही गंभीर जखमा झाल्या नाहीये. दोघांनीही सीट बेल्ट लावल्याचा त्यांना फायदा झाला, असं पोलिसांनी म्हटलं आहे. 



न्हावा शेवा पोलिसांनी बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी कलम 279 अंतर्गंत तक्रार दाखल केली आहे. तसंच, अपघातानंतर महिलेचे नातेवाईक सोमवारी कार घेऊन गेले आहेत. येत्या काही दिवसात या महिलेचे स्टेटमेंट घेण्यात येईल. सध्या या महिलेला मोठा धक्का बसला असून इतक्या मोठ्या अपघातातून ती सुदैवाने बचावली आहे. 


अटल सेतूवर प्रवास करताना प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असं अवाहन केलं आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करताना प्रवाशांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. कारच्या वेगाची मर्यादा पाळा तसंच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करुन नका. त्याचबरोबर कार थांबवून सेल्फी किंवा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करु नका. अटल सेतूवरुन कार चालवण्याआधी कारमधील टायरचे हवा तपासण्यात येईल. तसंच, कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक आहे, असं अवाहन नवी मुंबई पोलिसांनी केलं आहे.