कोल्हापूर: स्थानिकांचा संताप काय असतो हे भुदरगड येथील तालुका प्रशासनाला बुधवारी चांगलेच समजले. संतप्त ग्रामस्थांना आवरताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील पंडीतराव माईन्स एन्ड मिनरल्स या कंपनीत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी आज भुदरगड तालुक्यातील ग्रामस्थांनी भुदरगड पोलीस स्टेशन आणि भुदरगड तहसील कार्यालयात जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. रोजगारासाठी प्राधान्य देण्याची मागणी स्थानीक युवक वारंवार करत आहेत. मात्र याकडं कंपनीनं दुर्लक्ष केल्यामुळं संतापलेल्या युवकांनी अचानक भुदरगड पोलीस स्टेशन आणि भुदरगड तहसील कार्यालयात धावत येवुन अंगावर रॉकेल ओतुन घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.



दरम्यान, तिथं असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्यांच्या हातातुन रॉकेलचे कॅन काढुन घेतल्यानं अनर्थ टळला. या तीनही युवकांना ताब्यात घेतलय. मात्र युवकांनी  अचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली.