ठाणे : डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेर हा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दुकानासमोर कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली पूर्वेला रेल्वे स्थानकाच्या बाहेरच असलेल्या दुकानांच्या परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी पीडित महिला नीता वीरा आणि वितेश तिवारी यांची बाजूबाजूला दुकाने आहेत. दुकानातला कचरा एकमेकांच्या दुकानासमोर टाकण्याच्या वादातून बुधवारी संध्याकाळी त्यांच्यात वाद झाले. यावेळी तिवारी आणि त्याच्या दोन साथीदारांनी नीता वीरा यांच्या भावाला मारहाण केली. 


यावेळी नीता यांनी भावाला सोडवण्यासाठी तिवारी याला चप्पलने मारहाण केल्याने तिवारी आणि त्याच्या साथीदारांनी नीता यांनाही बेदम मारहाण केली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून वितेश तिवारी याला अटक केली आहे.