मुंबई: दिवसा घामाच्या धारा आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तळ कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू तर इतर ठिकाणी फळबागायदार आणि शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं ते चिंतेत आहे.


महापूर, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान यातून सावरत असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी


परभणी, बीड, नांदेड, अस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर भागांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 20 आणि 21 तारखेला साधारण राज्यभरात काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.