औरंगाबाद: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मंगळवारी औरंगाबादमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. शिवसेनेच्या पारंपारिक स्टाईलला छेद देत आदित्य ठाकरे यांनी तरुणांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमात आदित्य यांना लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आदित्य ठाकरे आता काय बोलणार, याकडे सगळ्यांचे कानही लागले होते. मात्र, आदित्य यांनी सगळे प्रश्न सुटले की आपण माझ्या लग्नाचं नंतर बघू, असे सांगत वेळ मारून नेली. त्यामुळे आदित्य यांनी अद्याप स्वत:च्या लग्नाचा विचार केला नसला तरी त्यांनी निवडणुकीच्या लग्नाची जय्यत तयारी केल्याचे औरंगाबादमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना कात टाकतेय... आदित्य ठाकरेंच्या चकाचक इव्हेंटची तरुणांना भुरळ


या कार्यक्रमाचा एकूणच बाज शिवसेनेच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होता. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना तरुणांशी मोकळेपणाने संवाद साधता यावा, यासाठी रॅम्प उभारण्यात आला होता. चकाचक स्टेज, रँम्प वॉक पोडीयम, तरूणांना बसण्यासाठी खास गॅलरी, रॉक बँड, तरूणांची गर्दी, लाईट्स, अर्ज भरून घेताना शिस्तबद्ध तरूणाई हे सगळे वातावरण शिवसेनेच्या पारंपरिक प्रतिमेला पुरते छेद देणारे होते. 


आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत


शिवसेनेचा हा नवीन अवतार तरुणांना भावल्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु झाली आहे. मराठमोळ्या पक्षाचा हा कॉर्पोरेट चेहरामोहरा अनेकांना आवडलाय. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत यामुळे शिवसेनेला यश मिळणार का, हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरेल.