मुंबई : सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्याकरता कोण काय करेल याचा काही नेम नाही? काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडची 'लेडी डॉन', 'थेरगाव क्विन' म्हणून ओळखली जाणारी तरूणी चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरूणीविरोधात अश्लील भाषेत शिव्यांचे व्हिडीओ तयार केल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. थेरगाव क्विनला पोलिसांनी अटक केली आहे. तरूणीला समज देऊन पोलिसांनी जामीनावर सोडलं आहे. पण ही 'थेरगाव क्विन' कोण आहे?


कोण आहे थेरगाव क्विन?


१८ वर्षांची साक्षी हेमंत श्रीश्रीमल 'थेरगाव क्विन' या नावाचं इंस्टाग्राम अकाऊंट चालवत होती. साक्षी तिच्या साथीदारांच्या मदतीने इंस्टाग्रामवर अश्लील भाषेत आणि धमकीचे अनेक व्हिडीओ पोस्ट करत होती. 


या व्हिडीओत कधी तिचे मित्र तर मैत्रिणींची देखील साथ होती. या तरूणीला इंस्टाग्रामवर ११ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. साक्षीने मित्रांच्या मदतीने मिळून इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत आणि धमकीचे अनेक व्हीड्ओ तिने तयार केले आहेत. (Thergao Queen : थेरगावच्या 'या' मुलीची थेरं काही ठिक नाहीत...) 


 


थेरगाव क्विनला रविवारी ३० जानेवारीला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर तरूणीने गुन्हा कबूल केला आहे. महत्वाचं म्हणजे तिने या प्रकरणात माफी देखील मागितली आहे. 


पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये साक्षी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षी ही मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. तिला आई वडील नाही त्यामुळे तिचा सांभाळा तिची आजी करते. साक्षी सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे.


तिने शिवीगाळ करणारे, अश्लील भाषा असलेले अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत. इन्स्टाग्रामवर मिळाणाऱ्या लाईक्सच्या हव्यासापोटी तिने असे व्हीडिओ तयार केल्याचे पोलीस चौकशीत मान्य केले आहेत. 


या तरूणीचे असंख्य फॉलोअर्स असल्यामुळे तिच्या व्हिडीओंचा मोठा परिणाम होतो. व्हिडिओ बनवून हीच मुलं गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे तिला पोलिसांकडून समज देण्यात आली आहे.