मुंबई : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण लाईक्स आणि शेअरसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही? शिवीगाळ करत अश्लिल व्हिडिओ आणि धमकी देणारे पोस्ट सोशल मीडियावर 'थेरगाव क्विन' नावाने अकाऊंट आहे.
लेडी डॉन म्हणून मिरवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी चांगलीच अद्दल शिकवली आहे. या तरुणीसह तिच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी महाले असं या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंम घोषित 'लेडी डॉन' म्हणून वावरत होती. या तरुणीने इंस्टाग्रामावर आपल्या 50 हजार लाईक मिळावे म्हणून नको ते उद्योग केले होते.
एवढंच नाहीतर 302 अर्थात खून करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासह तिच्या इतर साथीदाराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
साक्षी आणि कुणाल कांबळे त्याच बरोबर त्यांचे इतर मित्र इन्स्टाग्रामवर "थेरगाव क्वीन" नावाच्या प्रोफाइल वरून नागरिकांना धमकवण्याचे आणि अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरून इंस्टाग्रामवर रील बनवत होते.
या प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्यामुळे या टोळक्याविरोधात तक्रारी वाढल्याने पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आणि या सर्वांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले.
थेरगाव क्वीन अकाउंट वर लोकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचे काम साक्षी श्रीश्रीमहाले आणि तिचे टोळीतील सदस्य करत होते. त्यामुळे थेरगाव परिसरामध्ये लेडी डॉन साक्षीची मोठी दहशत निर्माण झाली होती.
मात्र, साक्षीची दहशत आता वाकड पोलिसांनी मोडून काढली आहे. लेडी डॉन साक्षी ची बातमी दिल्यानंतर वाकड पोलिसांनी लेडी डॉन साक्षीला समज दिली आहे. तिच्याविरोधात भादवि 292, 294, 506 आणि आयटीआय एकट नुसार गुन्हा दाखल केला आहे.