NCP Foundation Day : राष्ट्रवादीचे दोन्ही गट आज 25 वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट नगरमध्ये  तर अजित पवार गटाने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा केला. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात छगन भुजबळांनी उमेदवारांना चिमटे काढले.  लोकसभा प्रचाराला बोलावलं नाही. मला बोलावलं तर मतं कमी पडण्याची भीती अशी टोलेबाजी छगन भुजबळ यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटपर्यंत जागा वाटचपाचा गुऱ्हाळ चालवून काही होणार नाही. शिंदे जेवढ्या जागा मिळणार तेवढ्या जागा आम्हाला पण मिळाल्या पाहिजेत. सगळ्यांना उमेदवारी द्या. उमेदवारी देताना सगळ्यांचा विचार करा. दलित आणि आदिवासी यांना राखीव जागा असतात. मुसलमान अल्पसंख्याक बंधू... याना पण संधी दिली पाहिजे. त्यांना पाठिंबा देऊन सहकार्य केले पाहिजे. मराठा समाज, दलित समाज आदिवासी समाज सर्व एकत्र आहेत. यामुळे सर्वांना एकत्र घेऊन काम केले पाहिजे. 


मात्र, लोकांच्या डोक्यात घुसलं की 400 पार आपला बेडा पार. आपण तसं करणार नाही पण लोकांचा समज तसा झाला.‌ आता विधानसभा निवडणुका आहेत.  संविधान बदलाचा काही प्रश्न नाही.  त्यामुळं दलित, मुस्लिम, आदिवासी यांना पुन्हा आपल्याकडे आणायचं आहे. इंडिया आलायस दिशा भ्रम करण्यात यशस्वी झाले आहेत.  जागा वाटपाचा निपटारा लवकर करायला पाहिजे. जागा वाटपाचं गुऱ्हाळ चालू ठेवल्याने आपल्याला फायदा नाही.  शिंदे यांचे खासदार जास्त आले म्हणून त्यांना जास्त जागा असं करुन भांडणं नको... मी त्यांना सांगतो की, एकमेकासाह्य करु असे छगन भुजबळ म्हणाले.  न पूछो मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है। ना हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है... अशा प्रकारे शेरो शायरी करुन छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.