रत्नागिरी : शहरातील मराठा मैदानासमोरील बागेत आंबेशेत येथील तरूणाचा मृतदेह आढळाला. झाडाला फास लावलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेशेत येथील या तरूणाची आत्महात्या की घातपात याबाबत रत्नागिरी शहर पोलीस तपास करत आहेत. या तरूणाचं आडनाव नाचणकर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. बागेत गळफास लावलेल्या स्थितीत या तरूणाचा मृतदेह आढळला.


तरूणाच्या हातावर काही जखमा आहेत. मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणाजवळ रक्ताचा सडा देखील आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.